एक पाऊल महिला सक्षमीकरणाकडे; पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील सुमित्राबाई वरिष्ठ महिला महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश सुरू

पाचोरा, जळगाव: श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई अंतर्गत पाचोरा तालुक्यातील एकमेव महिला महाविद्यालय, सुमित्राबाई वरिष्ठ महिला महाविद्यालय, खेडगाव नंदीचे, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
महिलांना शिक्षणाची सुवर्णसंधी देणारे हे महाविद्यालय आपल्या शैक्षणिक स्वप्नांना नव्याने उभारी देण्यासाठी सज्ज आहे. अनेकदा वैवाहिक जीवनात लग्नानंतर शिक्षण घेणे अनेक महिलांना शक्य होत नाही किंवा काही कारणास्तव आपले महाविद्यालयीन शिक्षण अपूर्ण राहिले असेल, तर आता काळजी करू नका! आपल्या परिसरातील या महाविद्यालयात महिला शिक्षण पूर्ण करू शकता.
प्रवेशासाठी संपर्क:
अमोल पाटील सर
📞 7558498622 | 9307433775
सुमित्राबाई वरिष्ठ महिला महाविद्यालयात प्रवेश घेऊन आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच पाऊल उचला!