पाचोऱ्यात हिंदी भाषा सक्तीविरोधात मनविसेचा इशारा;शाळांना राज ठाकरेंचे पत्र सुपूर्द

मधुर खान्देश वृत्तसेवा | पाचोरा, दि. २३ जून २०२५: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) वतीने पाचोरा शहरातील शारदा इंग्लिश मीडियम आणि गुरुकुल इंग्लिश मीडियम शाळांमध्येत इयत्ता पहिली ते चौथीच्या अभ्यास कम्रात हिंदी भाषा शिकवण्याच्या सक्तीविरोधात तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पत्र शाळांच्या मुख्याध्यापकांना अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आले. यामध्ये शिंदे इंटरनॅशनल स्कूल,निर्मल इंटरनॅशनल स्कूल,शारदा इंग्लिश मीडियम व गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल यांना पत्र देण्यात आले आहे.यावेळी मनविसे जळगाव जिल्हाध्यक्ष कृष्णा दुंदुले यांनी शाळांना ठणकावून सांगितले की, पहिली ते चौथीच्या वर्गात हिंदी भाषा शिकवू नये तसेच, काही शाळांमध्ये महाराष्ट्र गीत गायले जात नसल्याचे निदर्शनास आले असून, ते तातडीने सुरू करण्याचे आदेश देण्यात यावेत यासंदर्भात शाळांना निवेदनही सादर करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मनविसे तालुकाध्यक्ष ओमराव सूर्यवंशी, आकाश बोरसे, नंदू हटकर, उदय सूर्यवंशी, अक्षय शिंदे यांच्यासह पालकवर्ग उपस्थित होता. कृष्णा दुंदुले यांनी यावेळी बोलताना सांगितले की, मराठी भाषा आणि संस्कृतीचे रक्षण करणे ही आमची प्राथमिकता आहे. हिंदी भाषेची सक्ती म्हणजे मराठी अस्मितेवर घाला आहे। शाळांनी राज साहेबांचे निर्देश पाळावेत, अन्यथा मनविसे याविरोधात आंदोलन उभे करेल.
पाचोरा शहरातील शाळांच्या मुख्याध्यापकांनी मनविसेच्या निवेदनाची दखल घेत महाराष्ट्र गीत सुरू करण्यासह हिंदी सक्तीच्या मुद्यावर विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेने पाचोरा शहरात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मनविसेच्या आक्रमक भूमिकेची चर्चा सुरू झाली आहे.
संपर्क: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, जळगाव
स्थळ: