जागतिक महिला दिनानिमित्ताने पाचोरा पोलीस स्टेशनच्या महिला कर्मचारी व महिला सहकाऱ्यांचा सन्मान!

दि. 8 मार्च 2025 रोजी पाचोरा पोलीस स्टेशन येथे जागतिक महिला दिनानिमित्ताने पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचारी, महिला होमगार्ड यांचा सत्कार सन्मान करण्यात आला आहे.

दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असतांना यशाच्या शिखरावर पोहोचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे एका कर्तुत्वान महिलेचा हात असतो. आपल्या घरातील सर्वप्रथम महिला असलेली आई, आपली बहीण,मुलगी त्याचबरोबर सभोवतालच्या परिसरामध्ये आपल्या कार्याचा भाग म्हणून ज्या ज्या महिलांशी आपला संपर्क येतो अशा महिलांचा सन्मान करणे आपली नैतिक जबाबदारी आहे.

जागतिक महिला दिनानिमित्ताने प्रशासनाच्या वतीने त्याचबरोबर सामाजिक संघटनांच्या वतीने महिलांचा सत्कार सन्मान केला जातो. या अनुषंगाने पाचोरा पोलीस स्टेशन येथे हा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक पवार तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके, योगेश जी गणगे,सुनील पाटील होमगार्डचे तालुका प्रमुख चंद्रकांत महाजन त्याचबरोबर पाचोरा पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी महिला होमगार्ड या ठिकाणी उपस्थित होत्या.
पाचोरा येथील ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक सी.एन. चौधरी यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देत या ठिकाणी महिलांना मार्गदर्शन केले आहे.यावेळी जेष्ठ पत्रकार अनिल येवले,मधुर खान्देश वृत्तपत्राचे संपादक राहुल महाजन उपस्थित होते.
