पाचोरा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर अहिरे यांचा वैजापूर येथील प्रवचनात भक्तसेवेसाठी पुढाकार

वैजापूर, दि. ०१ जुलै २०२५: सातगाव डोंगरी (ता. पाचोरा) येथील सामाजिक धडाडीचे कार्यकर्ते श्री. ज्ञानेश्वर भाऊ अहिरे यांनी वैजापूर येथे सुरू असलेल्या विश्वविख्यात प्रवचनकार श्री. प्रदीप मिश्रा यांच्या पाचदिवसीय प्रवचन कार्यक्रमात भक्तसेवेसाठी उल्लेखनीय योगदान दिले. पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पाचोरा परिसरात त्यांचा दांडगा जनसंपर्क असून, त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जवळीक साधत अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे सौहार्दपूर्ण संबंध असून, नेहमीच चांगल्या कार्यात सहकार्य करण्याची त्यांची भूमिका आहे.
गेल्या पाच दिवसांपासून वैजापूर येथे श्री. प्रदीप मिश्रा यांचे प्रवचन सुरू असून, या कार्यक्रमाला संपूर्ण मराठवाड्यासह देशभरातून प्रचंड जनसमुदाय उपस्थित आहे. या प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी लाखो भक्तांनी हजेरी लावली आहे. स्थानिक नागरिक भक्तांच्या सेवेसाठी अहोरात्र झटत असताना, श्री. ज्ञानेश्वर अहिरे यांनीही आपल्या सहकाऱ्यांसह वैजापूर येथे भक्तांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा परिवार, सामाजिक कार्यकर्ते श्री. अशोक तडवी, श्री. बबलू चौधरी तसेच गावातील मित्रमंडळी उपस्थित होती.
ज्ञानेश्वर अहिरे यांच्या या सेवाभावी कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांनी दाखवलेला हा पुढाकार सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरले आहे.