पाचोऱ्यात पुन्हा गावठी कट्ट्यासह इसमास पकडले!जळगाव एल.सी.बी शाखेची कारवाई!

राहुल महाजन,संपादक (मधुर खान्देश) शहरातील भारत डेअरी चौफुलीवर गावठी कट्ट्यासह एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पाचोरा शहरातील मुख्य महामार्गावर भारत डेअरी चौफुलीवर एक इसम गावठी कट्ट्यासह येत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाल्यानंतर पो. नि. बबन आव्हाड यांनी पो. उ. नि. शेखर डोमाळे, पो. हे. काॅ. लक्ष्मण पाटील, पोलीस जितू पाटील,पो. ना. रणजीत जाधव, पो. हे. काॅ. राहुल महाजन, पो. काॅ. प्रमोद ठाकुर यांचे पथक घटनास्थळी रवाना केले. सदर पथकाने भारत डेअरी चौफुलीवर एक इसम संशयास्पद फिरत असतांना त्याची चौकशी केली असता त्याने अश्विन उर्फ विशाल शंकर पाटील रा. देशमुखवाडी ता. पाचोरा असे सांगितले. अश्विन पाटील याची झडती घेतली असता त्याचे कमरेला 20 हजार रुपये किंमतीचा एक सिल्व्हर रंगाचे लोखंडी गावठी पिस्टल (कट्टा) आढळून आला. अश्विन शंकर पाटील यास पथकाने ताब्यात घेत त्याचे विरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार 1959 चे कलम 3/25 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे हे करीत आहे.