आमदारांच्या शिलेदाराकडून शासकीय योजनांसाठी मोफत अर्ज भरा! कार्यकर्ता बंडू सोनार यांचा विशेष उपक्रम

पाचोरा शहर आणि संपूर्ण मतदारसंघातील गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी आमदार पकिशोर आप्पा पाटील संस्थेच्या वतीने मोफत अर्ज भरण्याच्या विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 8 पासून या उपक्रमाला सुरुवात झाली असून प्रत्येक प्रभागात 5 कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत.
या उपक्रमाचे नेतृत्व जनसेवक बंडूभाऊ सोनार यांनी घेतले असून, गरजू नागरिकांना योजनांची माहिती, अर्ज भरण्याची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांसाठी मार्गदर्शन केले जात आहे. शिवतीर्थ, शिवसेना कार्यालय, पाचोरा येथे या योजनांसाठी नागरिकांना मदत केली जात आहे.
प्रमुख शासकीय योजनांसाठी आवश्यक कागदपत्रे:
1) बालसंगोपन योजना
आधार कार्ड
बँक पासबुक
मतदान कार्ड
रहिवासी दाखला
रेशन कार्ड
उत्पन्न दाखला (₹21,000 पर्यंत)
प्रतिज्ञापत्र
मुलांचा जन्म दाखला/बोनाफाईड प्रमाणपत्र
अर्जदाराचा फिटनेस सर्टिफिकेट
पतीचा मृत्यू दाखला
4 पासपोर्ट फोटो (स्वतःचे व मुलांचे)
संपूर्ण कुटुंबाचा घरासमोर काढलेला फोटो
2) श्रावणबाळ योजना
आधार कार्ड
बँक पासबुक
मतदान कार्ड/जन्म दाखला
रहिवासी दाखला
रेशन कार्ड
उत्पन्न दाखला (₹21,000 पर्यंत)
प्रतिज्ञापत्र
4 पासपोर्ट फोटो
3) संजय गांधी निराधार योजना
आधार कार्ड
बँक पासबुक
पतीचा मृत्यू दाखला
रहिवासी दाखला
रेशन कार्ड
उत्पन्न दाखला (₹21,000 पर्यंत)
प्रतिज्ञापत्र
4 पासपोर्ट फोटो
4) राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
मयत व्यक्तीचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (L.C)
आधार कार्ड
BPL दाखला
कुटुंब पत्रक (18 गुणांचे)
वारस दाखला
रेशन कार्ड
मतदान कार्ड
बँक पासबुक
2 पासपोर्ट फोटो
कुटुंब प्रमुख दाखला
5) नवीन मतदान कार्ड नोंदणी
आधार कार्ड
मोबाईल क्रमांक
पासपोर्ट फोटो
● जनतेसाठी अहोरात्र कार्यरत – जनसेवक बंडूभाऊ सोनार आणि त्यांच्या टीमचा पुढाकार
गरजू नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी जनसेवक बंडूभाऊ सोनार यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रताप भाऊ हटकर, संदीप भाऊ पाटील, राजेश जमदाडे, अविनाश भाऊ तडवी, कैलास भाऊ बागुल, सुनील भाऊ चौधरी, योगेश भाऊ पाटील, अशोक भाऊ महाजन, गणेश भाऊ चौधरी, दिपक भाऊ पाटील व इतर कार्यकर्ते शिवतीर्थ, शिवसेना कार्यालय, पाचोरा येथे नागरिकांना अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठी मार्गदर्शन आणि सहकार्य करत आहेत.
संबंधित नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जनसेवक बंडूभाऊ सोनार व त्यांच्या टीमने केले आहे.