नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

लाडशाखीय वाणी समाज उन्नती महिला मंडळाच्या वतीने ज्येष्ठ महिलांचा सत्कार! स्पर्धेत भाग घेतलेल्या विजेत्यांना बक्षीस वाटप


पाचोरा येथील लाडशाखीय वाणी समाज उन्नती महिला मंडळाच्या वतीने मागील पाच वर्षापासून समाजातील महिलांसाठी विविध उपक्रम व स्पर्धा कार्यक्रम घेण्यात येतात.यामध्ये उखाणे, संगीत खुर्ची,नाटिका तसेच विविध स्पर्धा घेऊन मंडळातर्फे समाजातील महिलांना कार्यक्रमानिमित्त एकत्रित आणून त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.  कार्यक्रमात समाजातील महिला आपल्यातील असलेले कलागुण जोपासण्यासाठी समाजातील सर्व महिलांना एकत्रित आणण्यासाठी समाज मंडळ हे कार्य तत्पर असतात.  उन्नती महिला मंडळ यांनी 8 मार्च रोजी महिला दिन असल्यामुळे उन्नती महिला मंडळ तर्फे समाजातील ज्येष्ठ महिलांचा सत्कार व सन्मान केला पाहिजे तसेच विविध स्पर्धा ठेवून महिलांनाही प्राधान्य द्यायला पाहिजे याकरिता हा कार्यक्रम आयोजित करून त्यांनी 9 मार्च रोजी रेणुका मंदिर भडगाव रोड येथे कार्यक्रम घेऊन ज्येष्ठ महिलांचा सत्कार व सन्मान केला तसेच विविध स्पर्धेच्या कार्यक्रमात सुरुवातीला महिला दिनानिमित्त “बाई पण भारी देवा” या गाण्यावर सौ मृणाली येवले व राजेश्वरी सिनकर यांनी खूप छान डान्स करून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच फॅन्सी ड्रेस स्पर्धेत विविध महिलांनी भाग घेतला त्या स्पर्धेमध्ये जिंकलेले सौ.प्रतिभा शेंडे, सौ सोनाली येवले, सौ रूपाली अमृतकर,सौ वैशाली सोनजे, सौ वैशाली चिंचोले या सर्वांना बक्षीस देऊन सन्मान करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजक रूपाली दूसे ह्या होत्या कार्यक्रमाची रूपरेषा व उत्कृष्ट सूत्रसंचालन सौ अनघा येवले यांनी केले आभार सविता चिंचोले यांनी केले तसेच या कार्यक्रमात ज्येष्ठ महिला सौ सुलोचनाताई सुभाष सिनकर,सौ उषाताई गणपत वाणी या उपस्थित होत्या. तसेच या सर्व नियोजन उन्नती महिला मंडळ अध्यक्ष सौ संगीता येवले,सौ सविता चिंचोले,सौ भारती येवले,सौ मनीषा येवले,सौ उज्वला तरटकर,सौ मीना शेंडे,सौ सुनिता येवले,सौ संध्या ताई ब्राह्मण कर,आशा कोतकर सौ सुनीता महालपुरे,सौ चारुशीला येवले ,सौ. विद्या कोतकर,सौ. अनघा येवले, राधिका येवले या सर्व महिला मंडळ सदस्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करून कार्यक्रम संपन्न झाला आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button