छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)- चाळीसगाव (93 किमी) – याच्या अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी ₹2.32 कोटी मंजूर

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने धाराशिव – बीड – छत्रपती संभाजीनगर (240 किमी) आणि छत्रपती संभाजीनगर – चाळीसगाव (93 किमी) या दोन नवीन रेल्वे मार्गांसाठी अंतिम स्थान सर्वेक्षणास मंजुरी दिली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी ₹8.32 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
✅ छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)- चाळीसगाव (93 किमी) – याच्या अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी ₹2.32 कोटी मंजूर झाले आहेत.
चाळीसगाव ते छत्रपती संभाजीनगर ही रेल्वे मार्गिका खान्देश व मराठवाड्याच्या दळणवळणाच्या सोयींमध्ये मोठी क्रांती घडवेल आणि विकासाला गती देईल.
💐 चाळीसगाव तालुक्याच्या तसेच खान्देशाच्या प्रगतीसाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असून भुसावळ नंतर चाळीसगाव रेल्वे जंक्शन चे महत्त्व वाढणार आहे!
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित चाळीसगाव – छत्रपती संभाजीनगर या रेल्वेमार्गाच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल असून राज्य शासनातर्फे देखील यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. सदर स्थान सर्वेक्षणाला मंजुरी दिल्याबद्दल मी पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदीजी, रेल्वेमंत्री मा.श्री. अश्विनी वैष्णवजी, मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीसजी, जलसंपदामंत्री मा.श्री.गिरीषभाऊ महाजन, खासदार मा.स्मिताताई वाघ यांचे जाहीर आभार…!
@narendramodi
@ashwini.vaishnaw
@devendra_fadnavis
@girishdmahajan
@smitatai_wagh
- आमदार मंगेश रमेश चव्हाण