रात्री पोलिसांत गुन्हा दाखल, तीन तासात आरोपीला अटक! पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत यांचा सत्कार

महाराष्ट्र सरकारची पोलीस यंत्रणा ही दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी अतिशय सक्रियपणे काम करतांना दिसून येत आहे यामध्ये विशेषतः जळगाव जिल्ह्यातील पाचोरा पोलीस ठाण्यात दि. 21/ 03 /2025 रोजी अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 कलम 92 (ब)(ड)(इ) तसेच BNS कलम 115,133,351(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा संवेदनशील असल्याने पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी तात्काळ पोलीस पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत व पोलीस हवालदार समीर पाटील यांना आरोपीचा शोध घेऊन हजर करण्यास सांगितले असता दोघांनी आरोपी यांचा पोलिसी पद्धतीने शोध घेऊन सदर आरोपीस अटक करून पुढील कारवाई करीता पाचोरा पोलीस ठाण्यात हजर केले आहे. सदर पोलीस कॉन्स्टेबल संदीप राजपूत यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे पोलीस निरीक्षक अशोक पवार तसेच पाचोरा पोलीस ठाण्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास पोलीस पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार भगवान चौधरी करीत आहेत.
यावेळी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, परशुराम दळवी प्रकाश चव्हाणके, अशोक पाटील तसेच पोलीस कर्मचारी निवृत्ती मोरे महाराज, विकास खैरे,गोपाल दादा तसेच आदी पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
