पाचोरा कृषी विभाग अंतर्गत तरुण बेरोजगारांना उद्योजक होण्याची संधी! “किसान गप्पा गोष्टी” कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी विभागांतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या संयुक्त विद्यमानाने प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत उद्योजकता निर्माण करण्याच्या हेतूने पाचोरा येथील तालुका कृषी अधिकारी जाधव यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी दिवसीय शाळा कार्यशाळा म्हणजे “किसान गप्पा गोष्टी” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांनी उपस्थित राहणे बाबत पाचोरा तालुका कृषी अधिकारी पाचोरा यांच्या वतीने अवाहन करण्यात आले आहे.
PMFME अंतर्गत खाद्यपदार्थ प्रक्रिया(Food Processing) अंतर्गत उद्योग
1) बेकरी उद्योग
2) केळीचे चिप्स निर्मिती उद्योग
3) बिस्किट निर्मिती उद्योग
4) पोहा निर्मिती उद्योग
5) काजू प्रक्रिया उद्योग
6) ब्रेड/टोस्ट निर्मिती उद्योग
7) केक निर्मिती उद्योग
8) चॉकलेट निर्मिती उद्योग
9) कोकोनट मिल्क पावडर निर्मिती उद्योग
10) कस्टर्ड पावडर निर्मिती उद्योग
11) दलीया निर्मिती उद्योग
12) डाळमिल
13) एनर्जी ड्रिंक निर्मिती उद्योग
14) पिठाची गिरणी
15) फ्रेंच फ्राय निर्मिती उद्योग
16) फ्रुट ज्युस निर्मिती उद्योग
17) अद्रक – लसुण पेस्ट निर्मिती उद्योग
18) ग्रेप वाईन निर्मिती उद्योग
19) शेंगदाणा/सोयाबीन/सूर्यफूल/करडी तेल निर्मिती उद्योग (तेलघाना लाकडी/यांत्रिक)
20) हिंग निर्मिती उद्योग
21) मध निर्मिती उद्योग
22) बर्फाचे तुकडे निर्मिती उद्योग
23) आइस क्रिम कोन निर्मिती उद्योग
24) आयोडिनयुक्त मिठ निर्मिती उद्योग
25) जैम व जेली निर्मिती उद्योग
26) लिंबू शरबत निर्मिती उद्योग
27) नुडल्स/शेवई निर्मिती उद्योग
28) सीलबंद पाणि उद्योग
29) पाम तेल निर्मिती उद्योग
30) पनीर/चिज निर्मिती उद्योग
31) पापड निर्मिती उद्योग
32) पास्ता निर्मिती उद्योग
33) लोणचे निर्मिती उद्योग
34) आलू चिप्स निर्मिती उद्योग
35) राईस ब्रान तेल निर्मिती उद्योग
36) सुगंधित सुपारी निर्मिती उद्योग
37) सोया चन्क निर्मिती उद्योग
38) सोया सॉस निर्मिती उद्योग
39) हळद / मसाले निर्मिती उद्योग
40) शुगर कँडी निर्मिती उद्योग
41) सोयाबीन पनीर व सोयाबीन खरमुरे निर्मिती उद्योग
42) इम्लीपल्प निर्मिती उद्योग
43) टोमैटो प्रोसेसिंग उद्योग
44) चेरी(टूटी फृटी)निर्मिती उद्योग
45) विनेगर निर्मिती उद्योग
सदर उद्योगांकरिता 35% अनुदान उपलब्ध आहे.
इच्छुक लाभार्थी यांनी आपआपली आवश्यक कागदपत्रे खाली दर्शवलेल्या संसाधन व्यक्ती यांच्याकडे जमा करावी.
तुमचा बँकेचा प्रस्ताव संबंधित संसाधन व्यक्ती तयार करतील.
तसेच उद्योग स्थापनेबाबत मार्गदर्शन करतील.
उद्योग स्थापन झाल्यावर अनुदान प्रस्ताव तयार करून अनुदान तुमच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया करतील.
जर वरील यादी पैकी कोणताही उद्योग आधीच अस्तित्वात व वापरात असेल तर, त्या उद्योगाचे विस्तारीकरण करण्यासाठी अर्ज करता येईल व विस्तारीकरण पूर्ण केल्यानंतर अनुदान सुध्दा भेटेल.
लाभार्थी :-
1) वैयक्तिक लाभार्थी
(शेतीची अट नाही)
2) गट लाभार्थी
(महिला व पुरूष गट)
3) शेतकरी उत्पादक कंपनी (FPO)
4) भागीदार संस्था
आवश्यक कागदपत्रे
1) PAN Card
2) आधार कार्ड
3) लाइट बिल
4) बँक स्टेटमेंट
5) मशिनरी कोटेशन (आवश्यक असल्यास)
