जळगाव जिल्हाताज्या बातम्या
भडगावात सोन्याच्या दुकानात चोरी! पोलीस घटनास्थळी दाखल.

भडगाव शहरातील मुख्य रहदारीच्या ठिकाणी असलेले घोडके सराफ या ज्वेलरीच्या दुकानाची मागील भिंत तोडून अज्ञात चोरट्यांनी सहा किलो चांदी व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.

भडगावातील मेन रोडवर चौकातील दुकान चोरट्यांनी फोडल्याने सुरक्षा यंत्रणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की मेन रोडवरील घोडके सराफ हे दुकान मालक बाहेर गावी गेल्याने दोन दिवसांपासून बंद होते. या दुकानाची मागची भिंत अज्ञात चोरट्यांनी तोडून दुकानाच्या मध्ये प्रवेश करत चोरी केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.