जळगाव जिल्हाताज्या बातम्या
पाचोऱ्यात विविध कारवाईत जप्त केलेल्या वाहनांचे आरटीओंकडून मूल्यांकन! तहसील आवारातील वाहनांची तपासणी

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील प्रशासनाच्या वतीने मागील काळापासू ते आज पर्यंत विविध कारवाई जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टर, डंपर,जेसीबी व इतर वाहन अशा विविध वाहनांचे मूल्यांकन करण्यासाठी भडगाव परिवहन विभागाच्या वतीने आरटीओ अधिकारी श्रद्धा महाजन त्याचबरोबर त्यांचे सहकारी आरटीओ वाहन सागर पाटील व वाल्मिक माळी यांच्यासह दाखल झाले होते.

याठिकाणी पाचोरा महसूल विभागाचे नायब तहसीलदार विनोद कुमावत व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून विविध वाहनांचे नंबर प्लेट, किलोमीटर,चेचेस नंबर तसेच आवश्यक ती माहिती देण्यात आली आहे. यामध्ये जवळपास 15 वाहनांची माहिती घेऊन सदर आरटीओ अधिकारी महाजन यांच्या वतीने याबाबत अहवाल सादर करून वरिष्ठ कार्यालयाला पाठवणार असल्याचे त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.





