पाचोऱ्यातील दुर्दैवी घटना! १६ वर्षांनी बाप झाल्याचे स्वप्न पूर्ण झाले पण मोठा अनर्थ झाला अन तिचा जीव गेला. चित्रपटाप्रमाणे खऱ्या जीवनातील अधुरी कहाणी…

पाचोरा शहर आणि दिनांक १९ मार्च या दिवशी तब्बल सोळा वर्षानंतर बाप होण्याचं स्वप्न ज्ञानेश्वर चौधरी यांचे पूर्ण झाले. अतिशय आनंदात हा परिवार एक नव्हे तर दोन बाळांचा जन्म झाल्याचा आनंद साजरा करत होते. परंतु अचानक जे घडले ते कदापी परमेश्वरालाही मान्य नसावे….दोन गोंडस बाळांच्या आईची मात्र प्राणज्योत मालवल्याची घटना घडली आहे. ही घटना एखाद्या चित्रपटाप्रमाणेच असून सदर घटनेची माहिती मिळताच पाचोरा शहरातील सावनेरकर हॉस्पिटलमध्ये नातेवाईक तसेच जवळच्या मंडळींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
पाचोरा : येथील बाहेरपुरा भागातील माहेरवाशी सौ.ज्योती ज्ञानेश्वर चौधरी वय अंदाजे ३७ या महिलेला लग्नाच्या सोहळा वर्षानंतर दि १९ मार्च २०२५ रोजी दुपारी ४ वाजता सावनेकर हॉस्पिटल येथे एक मुलगी एक मुलगा अश्या दोन बाळांना तिने जन्म दिला. दोन्ही बाळ जन्माला येताच ३ तासात बाळाला जन्म देणारी आई ज्योतीची मात्र प्राणज्योत मात्र हृदय विकाराचा झटका आल्याने मालवली आहे. या घटनेची माहिती मिळताच महिलेच्या परिवाराने हंबरडा फोडला होता. लग्न होऊन १६ वर्ष पूर्ण झाले तरी बाळ जन्माला येत नसल्याने आयुष्यात निराशा होती म्हणून मागील अनेक वर्षांपासून ज्योतीच्या परिवाराने नाशिक येथून वैद्यकीय उपचार घेतले होते. त्या अनुषंगाने योग्य उपचार घेतल्याने ज्योतीला दिवस गेले होते याचा आनंद गगनाला भिडणारा होता आणि या दोन्ही पती पत्नीला व दोन्हीच्या आई वडिलांना प्रचंड आनंद झाला. ज्योतीने १९ मार्च २०२५ रोजी एक मुलगा व एक मुलगी असे दोन बाळांना जन्म दिला याचा परिवाराला खूप आनंद झाला परंतु बाळच्या तिन तासाल नंतर त्या आनंदात दुःखाचा डोगर कोसळला. ज्योतीला अचानक हृदय विकारचा झटका आल्याने निधन झाले. या घटने मुळे शहरात प्रचंड हळहळ व्यक्त झाली असून ही घटना म्हणजे मराठी चित्रपट माहेरची साडी या चित्रपटात अभिनेत्री अलका कुबल ही जन्माला येते आणि तिच्या आईचे निधन होते सदर घटना या प्रकारे झाल्याचे पाचोरा बाहेरपुरा भागात बोलले जात आहे. या घटनेमुळे ज्योतीच्या माहेरी व सासरच्या परिवारावर दुःखाचा डोगर कोसळला आहे.
सदर घटनेची माहिती घेण्यासाठी पाचोरा येथील प्रसिद्ध सावनेरकर हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी प्रतिक्रिया घेतली असता यावेळी त्यांनी सांगितले की सदर महिलेची प्रसुती झाल्यानंतर दोन्ही बाळ हे अतिशय गुटगुटीत आणि चांगले जन्माला आल्याने खूप आनंदाचे वातावरण असतांना सायंकाळी अचानकपणे महिलेची प्रकृती खराब झाली होती. सदर महिलेस हृदयविकाराचा झटका आल्याने अतिशय दुर्दैवी घटना आहे-डॉ.मुकुंद सावनेरकर