जळगाव जिल्हाताज्या बातम्या
पाचोरा-भडगाव बियर बार असोसिएशनच्या वतीने बियरबार बंद आंदोलन! स्थानिक प्रशासनाला निवेदन

आज दिनांक 20 मार्च 2025 रोजी पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील सर्व परमिट रूम बियरबार व्यवसायिक बांधवांच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या व्हॅट टॅक्स व वाढीव नूतनीकरण फी बाबत निषेध म्हणून एक दिवसीय परमिट रूमबियर बार बंद पुकारण्यात आला होता.

सरकारने मद्य विक्री करणाऱ्या व्यावसायिक बांधवांचा विचार करावा व न्याय द्यावा दैनंदिन वाढत चाललेली अवैध मद्य विक्री ही बियरबार व्यावसायिकांसाठी धोक्याची घंटा आहे ‘अश्या विविध मागणीसाठी पाचोरा भडगाव बियर बार असोसिएशनच्या वतीने पाचोरा येथील प्रांत अधिकारी भूषण अहिरे त्याचबरोबर पोलीस निरीक्षक अशोक पवार व दारूबंदी विभागाच्या कार्यालयात कर्मचारी गिरीश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.

