नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाराज्य

भडगाव आरटीओ कार्यालयाच्या वतीने अवजड वाहनांना बसवले रिफ्लेक्टर!


Advertisements
Ad 4

जळगाव: भडगाव आणि चाळीसगाव येथील ऊपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) वायुवेग पथक क्र. 03 यांनी रस्त्यावर अवैधरित्या चालणारे गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर तसेच डंपर वर मार्च महिन्यात कारवाई करून मोठ्या प्रमाणावर दंड आकारला आहे. जळगाव चाळीसगाव महामार्ग दरम्यान रात्री चालणाऱ्या निदर्शनास आलेल्या अनेक वाहनांना मागे ब्रेक लाईट, इंडिकेटर, रिफ्लेक्टर नसल्याने त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनाला पुढचं काही दिसत नसल्याने मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागते त्या अनुषंगाने अशा वाहनाना RTO अधिकारी श्रद्धा महाजन, सहायक वाहन चालक वाल्मिक माळी, सागर पाटील, संतोष सूर्यवंशी सर्व टीमने त्या वाहनांना रिफ्लेक्टर लावून रस्ता सुरक्षा अभियानाचे अंतर्गत रस्त्यावरील वाहन चालकांना योग्य मार्गदर्शन करत सूचना करण्यात आल्या आहेत.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button