क्राईमजळगाव जिल्हा
पाचोरा:बहुळा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या शेतकऱ्यांच्या विहरीतील मोटारींच्या वायरींची चोरी!

पाचोरा तालुक्यातील बहुळा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या खेडगाव नंदीचे,साजगाव,पहाण, मोहाडी, वेरूळी येथील शेतकऱ्यांच्या विहिरीतील मोटारींच्या वायर कापून अज्ञात चोरट्याने पाट चारी जवळ आणून एकूण 22 शेतकऱ्यांच्या वायर जाळून टाकण्यात आल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी जाळून त्यामधील तांब्याचे तार काढून पळ काढला आहे. सदर घटनेची माहिती मिळतात तात्काळ शेतकऱ्यांनी पाचोरा पोलीस स्टेशन गाठले असता ठिकाणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याबाबत सदर घटनेची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून वर्तविण्यात आले आहे.
