पाचोरा : महात्मा फुले ब्रिगेड सामाजिक संघटनेत विठ्ठल महाजन माऊली आणि प्रदीप माळी यांची नियुक्ती

पाचोरा, दि. ०५ जुलै २०२५ : महात्मा फुले ब्रिगेड सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी शाहिर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली आणि पाचोरा तालुकाध्यक्षपदी भाऊसाहेब प्रदीप आसाराम माळी यांची निवड झाली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. स्वप्नील चंद्रशेखर बोबडे, प्रदेशाध्यक्ष आबासाहेब भास्करराव महाजन आणि जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश महाजन यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन ही निवड जाहीर करण्यात आली.
नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष शाहिर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली यांनी सांगितले की, समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय उन्नतीसाठी संघटना सतत कार्यरत राहील. समाजाला न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी तसेच संत-महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जयंती, पुण्यतिथी, सामाजिक आणि राष्ट्रीय देशभक्तीपर उपक्रम साजरे करत समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटना प्रयत्नशील राहील. महात्मा फुले ब्रिगेड सामाजिक संघटना समाजहितासाठी नवचैतन्य निर्माण करण्याच्या उद्देशाने स्थापन झाली असून, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत राहील.
या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून, समाजातून कौतुकाचा सूर उमटत आहे.