दूरदर्शनच्या फ्री डिश बघणाऱ्यांना मिळणार आता मोफत टीव्ही9 मराठी न्यूज चैनल!

मुंबई:सोशल मीडियाच्या गर्दीत सर्वच न्यूज चैनल तसेच मनोरंजन चॅनेल चालवणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. इंटरनेट च्या माध्यमातून जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जर आपण गेलो तर त्याठिकाणी आपल्याला सॅटेलाईट च्या माध्यमातून अनेक सुविधा मिळतात. सध्याच्या घडीला मोबाईल मध्ये विविध प्रकारचे अँप्स तसेच सोशल मीडिया प्लेटफॉर्म मुळे टीव्ही बघणाऱ्यांची संख्या कमी झाली असली तरी मात्र न्यूज चॅनल बघणार्यांची संख्या ही मात्र कमी झालेली नाही. दि.1 एप्रिल 2025 पासून टीव्ही नाईन मराठी न्यूज चॅनल हे दूरदर्शनच्या फ्री डिश वरती चॅनल नंबर 68 वर फ्री मध्ये दिसणार असून फ्री डिश वापरणाऱ्या ग्राहकांना हे आनंदाची बातमी मिळाली आहे. अनेक वर्षांपासून दूरदर्शनच्या फ्री डिश मध्ये एकही मराठी न्यूज चॅनल नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली होती परंतु आता टीव्ही नाईन मराठी चैनल आल्याने प्रेक्षक वर्गामध्ये आनंदाची वातावरण निर्माण झाले आहे.