जळगाव जिल्हाताज्या बातम्या
पाचोरा पोलिस निरीक्षकपदी राहुलकुमार पवार यांची नियुक्ती! पोलिस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत


पाचोरा, दि. 06 जुलै 2025: पाचोरा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकपदी राहुलकुमार पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशन येथे कार्यरत होते. 2006 मध्ये वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी पोलिस सेवेत रुजू झालेले राहुल पवार यांनी राज्यात अनेक ठिकाणी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली आहे. राहुलकुमार पवार यांनी स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) अहमदनगर, विशेष तपास पथक (एसआयडी), तसेच धुळे जिल्ह्यात विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांचे मूळगाव नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुका असून, त्यांनी एम.एस्सी. (कृषी) पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांच्या या नवीन नियुक्तीमुळे पाचोरा पोलिस स्टेशनच्या पोलिस खात्यातील कामे अधिक होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक पत्रकार बांधवांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे.



