पाचोरा येथील उद्धव ठाकरे सेनेचे फकिरचंद पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

मधुर खान्देश वृत्तसेवा | पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विकासकामांवर आणि नेतृत्वावर दृढ विश्वास ठेवत युवा नेते फकिरचंद पाटील यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला आहे.
फकिरचंद पाटील यांनी सांगितले की, “आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा-भडगाव मतदारसंघात केलेली विकासकामे वाखाणण्याजोगी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या परिसरातील प्रलंबित कामांना गती देऊन सामाजिक कार्याला अधिक बळकटी देईन. व आमदार पाटील यांच्या नेतृत्वामुळे मतदारसंघात विकासाची नवी गंगा अवतरली असून, यापुढेही त्यांच्या सोबत राहून जनसेवेचा वसा पुढे नेण्याचा आपला मानस आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोरजी बारवकर, युवा नेते सुमित दादा पाटील, जळगाव जिल्हा युवा सेना प्रमुख जितेंद्र जैन, शिवसेना शहर प्रमुख सुमित भाऊ सावंत, प्रवीण भाऊ ब्राह्मणे यांच्यासह अनेक शिवसेना आणि युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार किशोर पाटील यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण भाऊ पाटील आणि राजेश पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिवसेनेच्या वाढत्या जनाधाराचे आणि आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विकासकामांवरील लोकांच्या विश्वासाचे प्रतीक मानला जात आहे.