डोंबिवलीत संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधी सोहळा उत्साहात संपन्न; अनिल भाऊ महाजन यांचा माळी समाजाकडून जाहीर सत्कार

कल्याण:डोंबिवली, दि. २७ जुलै २०२५: डोंबिवली येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूल येथे संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल भाऊ महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांचा माळी समाज बांधवांकडून जाहीर सत्कार करण्यात आला.

मुंबई उपनगरात आणि महाराष्ट्रातील विविध भागांतून पोटापाण्यासाठी वास्तव्यास असलेल्या माळी समाजातील शेकडो कुटुंबांनी या सोहळ्याला हजेरी लावली. अनिल भाऊ महाजन यांनी समाज बांधवांना मार्गदर्शन करताना समाजाच्या प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचा संदेश दिला. त्यांच्या प्रेरणादायी भाषणाने उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण झाला.
कार्यक्रमात माळी समाजातील कुटुंबांनी सुसंस्कृतपणे एकत्र येऊन संत सावता महाराज यांच्या कार्याचा आणि शिकवणीचा गौरव केला. या सोहळ्याने समाजातील बंधुभाव आणि एकता दृढ करण्याचा प्रयत्न झाला. उपस्थितांनी संत सावता महाराज यांच्या समाधी सोहळ्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले.
