जळगाव जिल्हाताज्या बातम्याराज्य
पाचोऱ्यातील गणेश चौधरी यांचा महाराष्ट्र शासनाचा वतीने उत्कृष्ट कामगिरी बाबत गौरव! सर्वत्र अभिनंदन

पाचोरा, दि. 1 ऑगस्ट 2025: महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू असलेल्या महसूल सप्ताहानिमित्त पाचोरा तहसील कार्यालयात कर्मचारी गणेश तुळशीराम चौधरी यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. प्रांत अधिकारी भूषण अहिरे यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला.यावेळी पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे, भडगाव तहसीलदार शितल सोनाट, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे, पदम बापू पाटील तसेच नायब तहसीलदार विनोद कुमावत आणि इतर सहकारी उपस्थित होते. गणेश चौधरी यांनी महसूल विभागांतर्गत आपल्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.