जळगाव जिल्हाताज्या बातम्याराज्य
पाचोरा: कुरंगी गावातील अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त, तहसील कार्यालयात जमा

पाचोरा, दि. 2 ऑगस्ट 2025: उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा तहसील कार्यालयाच्या पथकाने मौजे माहेजी कुरंगी येथे अवैध वाळू वाहतूक करणारा निळ्या रंगाचा स्वराज 744 कंपनीचा विनानंबर ट्रॅक्टर जप्त केला. या कारवाईत वाहनचालक सचिन गंभीर सोनवणे (रा. परधाडे) आणि वाहनमालक नरेश गजानन शिंदे (रा. कुऱ्हाड) यांना 1 ब्रास वाळूसह पकडण्यात आले. जप्त केलेले ट्रॅक्टर आणि वाळू पाचोरा तहसील कार्यालयात जमा करण्यात आली. या कारवाईत उपविभागीय अधिकारी कार्यालय, पाचोरा येथील पथकातील गणेश लोखंडे (सहायक महसूल अधिकारी), योगेश सोनवणे (सहायक महसूल अधिकारी), मनोहर राजिंद्रे (महसूल सहाय्यक), कैलास श्रावणे (शिपाई), गुलाब पाटील (शिपाई) यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.