पोलिस राकेश खोंडे ऑन ड्यूटी २४ तास! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० कलमी कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी.

जळगांव जिल्ह्यातील कासोदा पोलीस स्टेशन येथे दिनांक ०२ एप्रिल २०२५ रोजी दाखल गुन्हा क्रमांक भाग ५. गुन्हा रजि नंबर ४३/२०२५. भारतीय न्याय संहीता (B.N.S.) सन २०२३ चे कलम ७४,३३३,१९५८(२१,३५२. ३५१०२५३,३८५) प्रमाणे गुन्हा पिडील महिला राह कासोदा, ता. एरंडोल यांनी दिलेल्या फिर्यादवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्यात एकूण चार आरोपी असून सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलिस कर्मचारी राकेश निर्मला दत्तात्रय खोंडे यांचेकडेस दिला असतांना त्यांनी मा. मुख्यामंत्री महाराष्ट्र राज्य यांचे १०० कलमी कार्यक्रमाचे अनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे सूचना व मार्गदर्शनाने, तत्परतेने सदर गुन्ह्यातील आरोपोतांचा शोध घेवून, व आरोपोतांविरूध्द सक्षम व ठोस पुरावे गोळा करून, सदर गुन्ह्याचा तपास २४ तासांचे आतमध्ये केला आहे. व सदर गुन्ह्याची कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयाचे पडताळणीनंतर, आरोपीतांच विरूध्द दोषारोपपत्र मा. न्यायदंडाधिकारी, प्रथमवर्ग न्यायालय, एरंडोल यांचेकडेस दाखल केले असून तपास अधिकारी यांना पोलीस अधिक्षक,जळगांव तसेच अपर पोलीस अधिक्षक चाळीसगांव भाग, उपविभागिय पोलीस अधिकारी चाळीसगांव भाग, सहा. पोलीस निरीक्षक कासोदा पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शन लाभले आहे. समाजात महीलांवरील होणारे अत्याचाराचे, समाजातील अति संवेदनशिल असणारे अतिमहत्वाचे दाखल गुन्ह्याचा तपास पो.हे. को.ब.नं.६९८ राकेश निर्मला दत्तात्रय खोंडे यांनी अतिशय अल्प काळात अहोरात्र मेहनत घेवून महाराष्ट्र शासनाचे व वरिष्ठ पोलीस अधिकारी जळगांव जिल्हा यांचे ठरवून दिलेले मुल्यांनुसार पूर्णत्वास आणला आहे त्यांनी केलेल्या कार्याबाबत त्यांचे समाजातील सर्व स्तरातून व पोलीस दलाकडून अभिनंदन तसेच कौतुक करण्यात येत आहे.