नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथे कृषी विषयक कार्यशाळा संपन्न! कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन.


Advertisements
Ad 4

दि.21 मार्च 2025 रोजी पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथे कृषी विभागातील विविध योजनांची गाव निहाय, मंडळनिहाय तालुक्याचा कृती आराखडा तयार करण्याची विशेष मोहीम दिनांक 20/03/2025 ते 25/03/2025 रोजी विविध गावामध्ये करण्याचे योजिले आहे. 

यामध्ये पी एम किसान- अंतर्गत ई केवायसी साठी तलाठी यांचे सोबत समन्वय योजने संदर्भात जनजागृती, मग्रारोहयो- अंतर्गत विविध फळ झाडांच्या लागवडीसह शेवगा लागवड तंत्रज्ञान व प्रोत्साहन व्यवसायिक दृष्ट्या लागवड आणि व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन, सूक्ष्म सिंचन योजना- अर्ज प्रक्रिया, योजनेचे फायदे, अनुदान, तांत्रिक मार्गदर्शन, PMFME – अर्जप्रक्रिया ते प्रकरणास बँक मंजुरी मिळणे पर्यंतचे मार्गदर्शन, आवश्यक कागदपत्रे बँकांचा सहभाग, जलयुक्त शिवार अभियान 2.0 – मृदसंधारणा विषयी जनजागृती सहभाग वाढविणे कामाची गुणवत्ता व जल स्रोतांचे व्यवस्थापन बाबतीत मार्गदर्शन, बियाणे व खत पुरवठा- सन 2025-26 मधील खरीप हंगामातील पीक नियोजन व पूर्वतयारी, ॲग्रीस्टॅक- प्रलंबित शेतकऱ्यांची नोंदणीसाठी कॅम्प-आवश्यक कागदपत्रे व मार्गदर्शन नोंदणी प्रक्रिया, मागेल त्याला शेततळे- तांत्रिक निकष, अर्ज प्रक्रिया, मापदंड व महत्व विषयी मार्गदर्शन,महाडीबीटीवरील सर्व योजना संदर्भात अर्ज प्रक्रिया कागदपत्रे आणि आणि योजनांचे महत्त्व,महाडीबीटीवरील कृषी यांत्रिकीकरण, संरक्षित शेती एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कार्यक्रमाचे महत्व व फायदे, डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान नियोजन व अंमलबजावणी,मृदा तपासणी विषयी जनजागृती, महत्व व फायदे,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री पिक विमा योजना 2025-26 च्या खरीप हंगामाची जनजागृती, कृषी विभागाच्या विविध विस्तार योजनांची माहिती, आत्मा योजनेअंतर्गत विविध घटक अशा विविध विषयांवर या ठिकाणी कृषी अधिकारी रमेश जाधव यांच्या वतीने मार्ग शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. यावेळी तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव मंडळ कृषी अधिकारी यु.आर.जाधव त्याचबरोबर खेडगाव नंदीचे येथील शेतकरी अशोक पितांबर पाटील,दिपक पाटील,बाला जामसिंग पाटील, कैलास रायसिंग पाटील, पिंटू गुजर, दत्तू धमाले, एस आर पाटील, सचिन पाटील,मनोज विनायक पाटील त्याचबरोबर कृषी सहाय्यक रवींद्र पाटील व माजी सरपंच पदी कैलास कुमावत व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button