ताज्या बातम्या
महाराष्ट्रातील अहिल्यानगरला राहणाऱ्या 74 वर्षीय आजी कमवितात यूट्यूबच्या मध्यातून लाखो रुपये!

अहिल्यानगरला राहणाऱ्या 74 वर्षीय सुमन धामणे यांना यूट्यूब किंवा इंटरनेटबद्दल काहीही माहिती नव्हती. एके दिवशी त्यांचा 17 वर्षीय नातू यश पाठक याने त्यांना पावभाजी बनवण्यास सांगितली. त्यांनी बनवलेली पावभाजी खूप टेस्टी होती. तेव्हा यशच्या डोक्यात त्यांच्या रेसिपींचे व्हिडिओ बनवण्याची कल्पना आली.
नोव्हेंबर 2019 मध्ये त्यांनी “Aapli Aaji” नावाने यूट्यूब चॅनेल सुरू केले. डिसेंबर 2019 मध्ये त्यांनी “कारल्याची भाजी” या रेसिपीचा व्हिडिओ अपलोड केला, ज्याला काही दिवसांतच 1 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले.
आज त्यांच्या युट्युब चॅनेल “Aapli Aaji” वर 1.76 मिलियन सबस्क्राइबर्स आहेत. त्या दरमहा 5 ते 6 लाख रुपये कमावतात. या यशामागे यशचे टेक्निकल नॉलेज आणि सुमन आजींची पारंपारिक पाककला यांचा मोठा वाटा आहे.
सुरुवातीला सुमन आजी कॅमेरासमोर बोलताना थोड्या संकोचल्या, परंतु हळूहळू त्या आत्मविश्वासाने बोलू लागल्या. त्यांनी इंग्रजी शब्दांचे उच्चार शिकले आणि विविध रेसिपींचे सुमारे 800 पेक्षा अधिक व्हिडिओज तयार केले.
ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांचे चॅनेल हॅक झाले होते, ज्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. पण यशने यूट्यूबच्या मदतीने चार दिवसांत चॅनेल परत मिळवले. या अनुभवामुळे त्यांची जिद्द आणखी वाढली.
आज “आपली आजी” चॅनेलवर पारंपारिक महाराष्ट्रीयन रेसिपींसह त्यांच्या आपली आजी ब्रँडच्या विविध मसाल्यांचे प्रॉडक्ट्स विकले जातात. 74 वर्षिय सुमन आजींच्या या यशस्वी प्रवासाने सिद्ध केले की, वय किंवा शिक्षण कधीही आपल्या आवडी आणि मेहनतीच्या आड येत नाही.