जळगाव जिल्हाताज्या बातम्या
पाचोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाची बैठक संपन्न! कार्यकर्त्यानो कामाला लागा…येणारे दिवस आपलेच

पाचोरा ते 12 मार्च 2025 रोजी शहरातील राजीव गांधी टाऊन हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून भास्करराव काळे त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांची उपस्थिती होती. याठिकाणी सध्याच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत संघटन करा नवीन कार्यकर्त्यांची फळी निर्माण करा येणारे दिवस नक्की आपलेच राहतील असा विश्वास पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे काम यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले आहे.

