हरवलेला चिमुरडा सुखरूप! पाचोरा पोलिसांमुळे आजी-नातवाची भेट! पोलिस कर्मचारी योगेश पाटील व संदीप भोईंची तत्परता.

मधुर खान्देश वृत्तसेवा | पाचोरा येथील तहसील आवारात हरवलेल्या एका ३ वर्षाच्या चिमुरड्याला पाचोरा पोलिसांनी तत्परता दाखवत त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. रोहन सुनील तवर (वय ३ वर्ष, राहणार कुऱ्हाड तांडा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव) असे या मुलाचे नाव आहे.
रोहन हा तहसील आवारात हरवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला शोधून पोलीस स्टेशनमध्ये आणले. पोलीस स्टेशनला आणल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तातडीने रोहनच्या आई-वडिलांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी योगेश सुरेश पाटील आणि संदीप भोई यांनी परिसरात तसेच उपलब्ध माहितीच्या आधारे कसून शोध घेतला. आजीच्या ताब्यात सुपूर्द पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे रोहनच्या कुटुंबीयांचा शोध लागला. रोहनला त्याची आजी कमलबाई प्रकाश तवर यांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले. या वेळी आजीने आणि कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले.
या घटनेमुळे पाचोरा पोलिसांच्या तत्परतेचे आणि संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.




