शासनाच्या महत्वाकांक्षी शंभर दिवसीय कार्यक्रमांतर्गत पाचोरा कृषी विभागाच्या कार्यालयीन अभिलेखांचे निंदनीकरण मोहीम!

पाचोरा: दिनांक १५ ते १७ एप्रिल २०२५ या कालावधीत हाती घेण्यात आलेली असून सदर मोहिमेत शिपाई वर्गापासून कृषी सेवक, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, कृषी अधिकारी,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, तालुका कृषी अधिकारी या सर्वांनी सहभाग नोंदवून मोहीम स्वरूपात निंदनीकरणाचे काम करण्यात येत आहे. सदर कामकाजात संपूर्ण अभिलेखाचे वर्गीकरण होणार असून भविष्यात कार्यालयीन कामकाजामध्ये माहिती मिळवणे व लाभार्थी शेतकऱ्यांकरिता काम करणे गतीचे होणार असून शेतकऱ्यांना त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. सदर उपक्रमातून तालुका कृषी अधिकारी पाचोरा यांच्या मार्फत विविध उपक्रम हाती घेण्यात आली आहेत त्यात प्रामुख्याने कार्यालयाची रंगरंगोटी, साफसफाई, कार्यालयाच्या दर्शनी भागात नामफलक तसेच विविध योजनेअंतर्गत तंत्रज्ञान प्रचिर व प्रसिद्धी साठी बॅनर व होर्डिग्ज लावण्यात आलेले आहेत. सदर उपक्रमांमध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची सजावट तसेच विविध प्रकारची माहिती दर्शक फलक, बॅनर दर्शनी स्थळी लावण्यात आलेले आहेत जेणेकरून तालुका कृषी अधिकारी कार्यालयात भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना माहिती मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची देखील दक्षता घेण्यात आलेली आहे. सदर उपक्रमांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम, गावबैठका, दौरे, शिवार फेरी,तसेच जमिनीचे आरोग्य टिकविण्यासाठी नैसर्गिक शेतक मिशन अंतर्गत प्रशिक्षण आयोजित मोहिमेत मार्गदर्शन करण्यात आलेले आहेत. सदर प्रशिक्षण कार्यक्रमात नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उदयन योजनेतून “चला उद्योजक होऊ या” ही अभिनव चळवळ हाती घेवून बॅका, जिल्हा संसाधन व्यक्ती, उद्योजक यांचा मिलाफ करून किसान गप्पा गोष्टीच्या माध्यमातून उद्योजक बनविण्याची चळवळ हाती घेण्यात आलेली आहे व ऍग्री स्टॅक योजनेअंतर्गत बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्यांचे ओळखपत्र तयार करण्याचे कार्य तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत संपन्न करण्यात आलेले आहेत,एवढेच नाही तर ,”कृषि कीर्तन सप्ताह “या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत देखील वरील योजना व तंत्रज्ञान ची मोहिम राबविण्यात आलेली आहेत. त्यासोबतच विविध वर्तमानपत्रातून, वृत्तवाहिन्यातून तसेच समाज माध्यमातून, आकाशवाणीवरून, गाव बैठकांच्या मोहिमेत शेतकऱ्यांना आवाहन सुद्धा करण्यात आलेली आहेत.त्याप्रमाणेच पिएम-किसान योजनेअंतर्गत प्रलंबित ईकेवायसी आधार सीडिंग, लॅन्ड सिडींग करण्याबाबत गावागावात कृषि विभागातील कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जावून,शेतावर जाऊन देखील मोहिम राबविण्यात आल्या, अशा पद्धतीनेच महाराष्ट्र शासनाचा 100 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत पाचोरा कृषि विभाग कामकाज करून एक आदर्श निर्माण केला आहे.