नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोऱ्यात थंड पाण्याच्या जारमुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; लक्ष्मण (लकी पाटील) यांची प्रशासनाकडून कारवाईची मागणी


Advertisements
Ad 4

पाचोरा, दि. २५ मे २०२५: पाचोरा शहरात थंड पाण्याच्या जारच्या नावाखाली सिंधी कॉलनी परिसरातील एका थंड पाणी विक्रेत्याकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कृष्णापुरी परिसरातील लक्ष्मण उर्फ लकी पाटील यांच्या कुटुंबाने याबाबत आपबीती सांगितली असून, थंड पाण्याच्या जारमध्ये केमिकलचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पाटील कुटुंबाने सांगितले की, त्यांनी घरात मागवलेल्या थंड पाण्याच्या जारमधील पाणी वापरल्यानंतर कुटुंबातील काही सदस्यांना तब्येतीच्या तक्रारी जाणवू लागल्या. यावर जानकार मंडळीकडून माहिती घेतली असता, पाणी जास्त वेळ थंड राहावे म्हणून त्यात केमिकल मिसळले जाते? कदाचित असे केमिकल युक्त पाणी पिण्यामध्ये आल्याने अशा पाण्यामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो असे मत केले आहे. पाटील कुटुंबाने याप्रकरणी प्रशासनाकडे कारवाईची मागणी करणार आहेत. पाणी पुरवठा करणाऱ्या कुठलाही परवाना न घेता बिनधास्त पाण्याच्या मोठ्या टाक्यांमध्ये पाणी भरून गल्लो गल्ली फिरत असून यावर कडक नियम लागू करून त्यांच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. याबाबत प्रशासन काय पावले उचलते जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच नागरिकांना पाण्याच्या जारची नियमित नागरिकांनी थंड पाण्याचे जार खरेदी करतांना सावधगिरी बाळगावी आणि विश्वसनीय पुरवठादारांकडूनच पाणी मागवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button