पोलिस स्थानकात 23 मार्च रोजी शहीद भगतसिंगांच्या फोटोला पुष्पहार अर्पण! परंतु पाचोऱ्यातील अनेक शासकीय कार्यालयांना विसर

पाचोरा:भारतात ब्रिटिश सरकारच्या माध्यमातून स्वातंत्र्यापूर्वी वीर भगतसिंग यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. 23 मार्च हा शहीद दिन म्हणून घोषित करण्यात आला असून या अनुषंगाने सर्वत्र शासकीय निय-शासकीय कार्यालयांमध्ये प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात यावा याबाबत शासनाच्या वतीने परिपत्रक असतांना देखील पाचोरा तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयांमध्ये शहीद दिना निमित्ताने कुठल्याही प्रकारचे प्रतिमा पूजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नव्हते यानंतरच्या सर्व महापुरुषांचे परिपत्रकानुसार दिवसांचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे अशी मत सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले आहे.
पाचोरा पोलीस स्टेशनच्या वतीने 23 मार्च 2025 रोजी शहीद दिनानिमित्ताने वीर भगतसिंग यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले आहे. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक पवार, उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके,परशुराम दळवी पोलीस कर्मचारी समीर पाटील, गोपाल दादा त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते जावेद शेख व त्यांचे सहकारी उपस्थित होते.