पाचोरा येथील माजी नगरसेवक संजय एरंडे यांच्यासह उमेश एरंडे व मित्र परिवाराचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये जंगी प्रवेश

मधुर खान्देश वृत्तसेवा | पाचोरा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक संजय एरंडे यांनी नुकतेच शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केल्यानंतर, त्यांचे पुत्र उमेश एरंडे यांच्यासह त्यांच्या मित्र परिवाराने देखील मुंबई येथे शिवसेना (शिंदे गट) मध्ये जंगी प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या सोहळ्याला पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, स्विय सहाय्यक राजेश पाटील,शिवसेना शहराध्यक्ष सुमित सावंत आणि युवा सेनेचे जय बारावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या प्रवेश सोहळ्यात उमेश एरंडे यांच्यासह विशाल जाधव, प्रमोद महाले, विवेक मराठे, सनी कलाल, विकी वारुळे, शिवम देसले, सौरभ पाटील, अमोल पाटील, प्रफुल पाटील, शुभम शिंदे, बंटी पाटील, अबीद शेख, शुभम देठे, गौरव पाटील, मनोज बडगुजर, तुषार नैनाव, आकाश दत्तू आणि प्रसाद पाटील यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. या सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवत, स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रसंगी बोलताना, “पाचोरा येथील कार्यकर्त्यांचा हा प्रवेश शिवसेना (शिंदे गट) ची ताकद वाढवणारा असून संजय एरंडे यांच्यासह उमेश एरंडे आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या प्रवेशामुळे पाचोरा तालुक्यात पक्षाला नवीन बळ मिळेल. आम्ही सर्वजण एकत्रितपणे जनतेच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी कार्य करू अशी गावही प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे.
हा प्रवेश सोहळा पाचोरा तालुक्यातील शिवसेना (शिंदे गट) च्या वाढत्या प्रभावाचे द्योतक मानला जात आहे. येणाऱ्या काळात या नव्या कार्यकर्त्यांच्या जोमाने पक्षाला स्थानिक पातळीवर अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.