नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यात शेततळ्यात पडून शेतमजुरसह बालकाचा मृत्यू; अंतुर्ली बुद्रुक येथील दुर्दैवी घटना


Advertisements
Ad 4

पाचोरा, दि. 08 मे 2025: पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली बुद्रुक शिवारात शेततळ्यात पडून दोन शेतमजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतांमध्ये रवी परभत कोळी (वय 14, रा. पुनगाव) आणि पदमसिंग भगवान पाटील (वय 21, रा. अंतुर्ली बुद्रुक) यांचा समावेश आहे. दोघेही शेतमजुरीचे काम करत होते. सदर घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका चालक निळू पाटील आणि सागर पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button