नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारण

छावा क्रांतिवीर सेनेच्या पाचोरा तालुकाध्यक्षपदी अजय पाटील यांची नियुक्ती


Advertisements
Ad 4

पाचोरा: येथील छावा क्रांतिवीर सेनेच्या तालुकाध्यक्षपदी अजय साहेबराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजय पाटील यांनी छावा क्रांतिवीर सेनेमध्ये कार्यकर्ता म्हणून समाधानकारक कार्य केले आहे. तसेच त्यांनी संघटनेच्या प्रशिक्षण शिबिरात सहभाग घेऊन संघटन बांधणीची माहिती घेतलेली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. करण गायकवाड यांच्या आदेशानुसार त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल प्रदेश कार्यकारिणी तसेच जिल्हा कार्यकारिणीने अजय पाटील यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.अजय पाटील यांनी या पदाचा स्वीकार करून छावा क्रांतिवीर सेनेचे धडाडीने कार्य करावे आणि संघटनेच्या नियमानुसार योग्य प्रकारे कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button