नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
क्राईमजळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यातील नाचनखेडा सोसायटीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह: पीक कर्ज नाकारल्याने चौकशीची मागणी


Advertisements
Ad 4

नाचनखेडा येथील शेतकऱ्याचा गंभीर आरोप

नाचनखेडा (ता. पाचोरा) येथील रहिवासी व सभासद ॲड. सुनील नवल सोनवणे यांनी नाचनखेडा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सचिव व संचालक मंडळाच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर तक्रार नोंदवली आहे. त्यांनी संस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सचिव आणि संचालक मंडळावर योग्य ती कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

ॲड. सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मालकीच्या शेतीसाठी पीक कर्जाची मागणी केली असता, शेतजमिनीवर १९९१ मधील जुन्या बँक कर्जाचा बोजा असल्याचे कारण सांगून संस्थेने कर्ज देण्यास नकार दिला. मात्र, अगदी समान परिस्थिती असलेल्या इतर अनेक शेतकऱ्यांना सोसायटीकडून पीक कर्जाचा लाभ देण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे संस्थेकडून समान सभासदांशी भेदभाव केला जात असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे.

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, सभासदांच्या बैठकीत ॲड. सोनवणे यांच्या आई व बहिणीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यात आली. तसेच “तुम्हाला पीक कर्ज मिळणार नाही, तुम्ही चुकीने वारस लागलेले आहात आणि तुम्हाला सोसायटीत मतदानाचा अधिकारही नाही,” अशा शब्दांत सचिवांकडून गैरवर्तन करण्यात आल्याचा दावा ॲड. सोनवणे यांनी केला आहे. या प्रकारामुळे सभासदांच्या कायदेशीर व मूलभूत अधिकारांवर गदा येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

समान निकष सर्वांसाठी लागू आहेत का, याची सत्यता पडताळण्यासाठी मागील काही वर्षांतील पीक कर्ज वितरण, कर्जमाफीचे लाभ, ७/१२ वरील बोजे आणि कर्ज मंजुरी/नामंजुरीच्या कारणांची निष्पक्ष कागदोपत्री चौकशी करण्याची मागणी ॲड. सोनवणे यांनी केली आहे. याप्रकरणी संबंधित सचिव व संचालक मंडळावर ‘महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्या’नुसार कारवाई व्हावी, यासाठी तक्रारीच्या प्रती जिल्हा उपनिबंधक, विभागीय सहनिबंधक, जिल्हाधिकारी आणि समाजकल्याण विभागाकडे पाठवण्यात आल्या आहेत.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button