नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारणराज्यराष्ट्रीय

पाचोरा मतदारसंघाच्या विकासाला गती: आमदार किशोर पाटील यांच्या पाठपुराव्यातून पाचोरा डेपोला ५ नव्या ‘जिजाऊ’ बसेस दाखल; सुमित पाटील यांच्या हस्ते लोकार्पण


Advertisements
Ad 4

पाचोरा:
पाचोरा आणि परिसरातील प्रवाशांची वाढती संख्या, तसेच ग्रामीण व शहरी भागातील वाहतुकीची कोंडी लक्षात घेता, स्थानिक प्रवाशांच्या सोयीसाठी पाच नवीन ‘जिजाऊ’ बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, आज पाचोरा बसस्थानक येथे या नव्या बसेसचा भव्य शुभारंभ व उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.

या नव्या बससेवेचे उद्घाटन पाचोरा नगरपरिषदेचे गट नेते तथा युवा नेते सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या नवीन बसेसमुळे पाचोरा शहर तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रोजचा प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मतदारसंघातील वाहतुकीचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे ही सुविधा उपलब्ध झाली असून, संपूर्ण तालुक्यात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.

या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बस डेपोचे विभागीय व्यवस्थापक (DM) मनोज भाई, उपनगराध्यक्ष किशोर आप्पा बारवकर, सुमित सावंत, सतीश आबा चेडे, किशोर पाटील, अमृत पाटील, शहर प्रमुख भोला पाटील, रेहमान तडवी, सलीम शेख यांच्यासह एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही नवी बससेवा पाचोरा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button