नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारणराष्ट्रीयशैक्षणिक

शेतकरी, शेतमजूर व विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी महाविकास आघाडीचे उद्या पाचोऱ्यात आंदोलन


Advertisements
Ad 4

कर्जमाफी, पीकविमा, दुष्काळी अनुदान व शैक्षणिक फी माफीसह विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

पाचोरा, दि. १८ ऑक्टोबर :
पाचोरा (प्रतिनिधी) –
शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी पाचोरा येथे भव्य आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी तसेच नागरिकांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्यात यावी, शेतमजुरांना २५ हजार रुपये अनुदान मिळावे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, मागील काळातील थकीत दुष्काळी अनुदान तातडीने वितरित करावे आणि पीकविम्याची रक्कम मंजूर करावी, सातगाव डोंगरी सह शिंदाड परीसरातील नागरीक आणि शेतकऱ्यांचे मागील वर्षी चे पंचनामे होवुन नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही, अशा प्रमुख मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहेत. यासोबतच सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी, तसेच बॅनरमध्ये नमूद केलेल्या इतर मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांकडून मांडण्यात येणार आहे.

शेतकरी आणि शेतमजुरांच्या आर्थिक अडचणी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेच्या विविध समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जनतेच्या न्याय्य मागण्यांसाठी एकजुटीने आवाज उठवण्याचा निर्धार या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात येणार आहे.

आंदोलनाचा तपशील : सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोरा येथे हे आंदोलन होणार आहे. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

“शेतकरी वाचला पाहिजे, शेतमजूर जगला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे,” या भूमिकेतून आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाकडे पाचोरा तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button