नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोऱ्यात महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने “गाठोड प्रबोधनाचा शाहिरी जलसा” नक्कीच बघा!


Advertisements
Ad 4

एकदा नक्कीच बघा या साहित्य कला जपणारा पाचोऱ्यातील युवक तुषार पुष्पा सुर्यवंशी यांचे सादरीकरण

पाचोरा शहरामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने ‘गाठोडं प्रबोधनाचं व शाहिरी जलसा’कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नव्या दमाचं – क्रांतिकारी आशयाचं, नव्या युगाच – नव युद्ध
भारुड कला प्रकारावर आधारित मनोरंजनातून प्रबोधनासाठी गाठोडं प्रबोधनाचं या विशेष कार्यक्रमाचे आयोजन 11 एप्रिल 2025 शुक्रवार रोजी सायंकाळी साडेसात वाजता शहरातील महात्मा फुले स्मारक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ स्टेशन रोड येथे जयहिंद क्रीडा व लेझीम मंडळ,कृष्णापुरी पाचोरा यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर गाठोड प्रबोधनाचे सादरकर्ते – तुषार पुष्पदीप सूर्यवंशी,स्वाती त्रिभुवन, रवींद्र थोरात, बुद्धभूषण कांबळे आणि टीमच्या वतीने सादर करण्यात येणार आहे. या सुंदर अशा साहित्य, कला जपणाऱ्या या गाठोड प्रबोधनाच्या माध्यमातून हा कार्यक्रम बघायला मात्र विसरू नका असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button