नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोऱ्यात एकाच रात्री तीन घरफोड्या झाल्याची घटना!


Advertisements
Ad 4

पाचोरा येथे बंद घरांचे कडीकोयंडे तोडून चोरट्यांनी एका रात्री एकाच चाळीतील तीन घरे फोडून रोकड व दागिन्यांसह देव्हाऱ्यातील चांदीच्या मूर्तीही चोरून नेल्याची घटना शहरातील पुनगाव शिवारातील विद्यानगर भागात घडली आहे. पाचोरा शहरातील पुनगाव शिवारातील विद्यानगर भागात राहणाऱ्या भाडेकरूंची तीन घरे बंद अवस्थेत होती. तिघेही भाडेकरू वेगवेगळ्या ठिकाणी बाहेरगावी कार्यक्रमास गेले असल्याची चोरट्यांनी संधी साधत १८ रोजी मध्यरात्रीनंतर जिवेश राजेंद्र चिंचोले यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी प्रवेश करीत कपाट उघडून त्यातील काही रोकड लांबवली असून त्यांच्या घरातील देव्हाऱ्यातील चांदीचे देवही चोरट्याने चोरून नेले असल्याची माहिती मिळाली आहे. यांच्या शेजारील भगवान हिलाल पाटील हे देखील बाहेरगावी असल्याने त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडण्यात आला व कपाटातील किरकोळ दागिने व रक्कम देखील चोरून नेल्याचे आढळून आले असून १९ रोजी सकाळी शेजारच्यांनी बंद घरे तोडल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांना फोन करून खबर देण्यात आली होती. पोलिसांनी सीसीटीव्हीचा आधार घेत चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न केला असून मात्र अद्यापही चोरट्यांना पकडण्यात यश आलेले नाही. दरम्यान बाहेरगावी गेलेले घरमालक घरी परत आले नसल्याने अद्याप पोलिसात गुन्हा दाखल झालेला नसल्याने चोऱ्यांमध्ये नेमका किती मुद्देमाल चोरीस गेला, याचीही माहिती मिळू शकली नाही.पाचोरा शहरात दिवसागणिक चोरट्यांचे प्रमाण वाढत असून पोलिसांपुढे मोठे असल्याचे चित्र आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button