नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

ग्राम महसूल अधिकारी संघटनेची पाचोरा विभागाची नवीन कार्यकारिणी जाहीर;अध्यक्षपदी आशिष काकडे यांची निवड


Advertisements
Ad 4

मधुर खान्देश वृत्तसेवा:पाचोरा येथील ग्राम महसूल अधिकारी संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या बैठकीत सर्व सदस्यांच्या उपस्थितीत ही निवड प्रकिया पार पडली असून यामध्ये अध्यक्ष पदाची धुरा ही युवा तलाठी आशिष कडुबा काकडे तर सचिव म्हणून दिपक शिवाजी दवंगे,सहसचिव तातेराव सपकाळ,उपाध्यक्ष राजेंद्र शिरसाट,कार्याध्यक्ष: रायगडे मॅडम,खजिनदार अतुल देवरे त्याच बरोबर सल्लागार म्हणून नकुल काळकर अशांची निवड करण्यात आली आहे. या नवीन कार्यकारिणीने भविष्यात महसूल प्रशासनाशी संबंधित मुद्द्यांवर संघटनेच्या वतीने सकारात्मक भूमिका घेऊन कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला असून संघटनेचे संघटन, सदस्यांचे प्रश्न आणि ग्राम पातळीवरील महसूल कामकाज अधिक प्रभावीपणे पार पाडणे या दिशेने काम होईल असे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सांगितले. कार्यक्रमानंतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार तहसीलदार विजय बनसोडे यांच्या वतीने करण्यात आला आहे. यावेळी संघटनेचे सदस्य व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो कॅप्शन : नवीन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल अध्यक्ष आशिष काकडे यांचे अभिनंदन करतांना तहसीलदार विजय बनसोडे.

संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button