पाचोरा तालुक्यातील युवा शेतकरी स्वप्निल महाजन यांना ‘कृषी रत्न’ पुरस्काराने सन्मानित! आमदार किशोर पाटील तसेच प्रांताधिकारी भूषण अहिरे यांच्या हस्ते पुरस्कार.

पाचोरा, [दि. ४ एप्रिल २०२५]: पाचोरा तालुक्यातील पहाण गावातील युवा शेतकरी स्वप्निल नारायण महाजन यांना त्यांच्या कृषी क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी “कृषी रत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार त्यांना पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील आणि प्रांत अधिकारी भूषण अहिरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या सन्मान सोहळ्याचे आयोजन मधुर खान्देश या वृत्त संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. पाचोरा तालुक्यात अग्रगण्य स्थान असलेली ही संस्था कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी विविध पुरस्कार प्रदान करते. स्वप्निल महाजन यांनी शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग आणि उत्पादन वाढीसाठी केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. शेतीला जोड धंदा म्हणून पशु खाद्य व मुरघास उद्योग समूह सुरू करून स्वप्नील यांनी समाजात चांगले नाव लौकिक केले आहे
हा पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला असून आमदार किशोर पाटील यांनी स्वप्निल महाजन यांच्या या यशाचे कौतुक केले असून त्यांचे कार्य इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.