जळगाव जिल्हाताज्या बातम्या
पाचोऱ्यात महावितरण कार्यालयाच्या स्पेअर गोडाऊनला आग! पाचोरा नगरपालिका अग्निशामक दलाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी.

पाचोरा शहरातील गिरड रोडवर असलेल्या महावितरणच्या मुख्य कार्यालयाच्या स्पेअर गोडाऊनला अचानकपणे आग लागल्याने एकच गोंधळ उडाला होता. घटनास्थळी पाचोरा नगरपालिकेचे अग्निशामक दल दाखल झाला असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते. याठिकाणी तात्काळ पोलिसांनी देखील मदतकार्य करत आग विझवण्यासाठी मदत केली आहे.