नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोऱ्यातील लक्ष्मण अन् जावेदची ईमानदारी; सापडलेला मोबाईल केला पोलिसांच्या स्वाधीन


Advertisements
Ad 4

मधुर खान्देश वृत्तसेवा: पाचोरा शहरातील प्रवीण सोडा या दुकानाजवळ काही कामानिमित्त एक मुलगी व तिचा भाऊ आला असता त्यांचा नजरचुकीने अंदाजित २० हजार रुपये किमतीचा मोबाईल त्या ठिकाणी राहून गेला होता.  त्याठिकाणी पाचोरा शहरातील देशदूत वृत्तपत्राचे प्रतिनिधी लक्ष्मण सूर्यवंशी व वार्ताहर जाविद शेख यांना सदर मोबाईल नजरचुकीने राहून गेला असल्याचे समजले असता तात्काळ त्यांनी पाचोरा पोलीस स्टेशन ला मोबाईल जमा केला होता. सदर मोबाईलची योग्य ती खातरजमा करून मूळ मालकास परत करण्यात यावा असे पोलिसांना विनंती केली असता पाचोरा पोलिस स्टेशनला नियुक्तीस असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे व पीएसआय श्री प्रकाश चव्हाणके यांनी त्या मोबाईलवरून त्यांच्या परिवाराशी संपर्क साधून मूळ मालकास बोलवून खातरजमा करून माहिती घेतली असता तुमचा मोबाईल कोणत्या कंपनीचा व कशा कलरचा होता त्यांनी सांगितले त्या वर्णन प्रमाणे हा तोच मोबाईल आहे याची खात्री करून तो मोबाईल हरवलेल्या व्यक्तीच्या ताब्यात देण्यात आला आहे. तसेच प्रामाणिक पणा दाखविल्याबद्दल जावीद शेख व लक्ष्मण सूर्यवंशी यांचे आभार मानले आहेत.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button