नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्यामनोरंजन

जळगावमध्ये ‘पत्रकार प्रीमियर लीग’चा थरार; पाचोरा संघाने नोंदवला सहभाग, मंत्र्यांच्या हस्ते सामन्यांचा प्रारंभ


Advertisements
Ad 4

जळगाव: दैनंदिन बातम्यांच्या धावपळीतून आणि लेखणीच्या व्यापातून थोडा विरंगुळा मिळावा, तसेच शारीरिक तंदुरुस्ती जपली जावी या उद्देशाने जळगाव येथे भव्य ‘पत्रकार प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील एकूण २७ संघांनी सहभाग नोंदवला असून पाचोरा येथील पत्रकार बांधवांनीही आपले कौशल्य मैदानावर दाखवले आहे. पत्रकारिता क्षेत्रात काम करताना पत्रकार बांधवांना सतत मानसिक ताणतणाव आणि थकव्याचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, या विचाराने ‘पत्रकार विरुद्ध पत्रकार’ अशा क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत जय-पराजयापेक्षा पत्रकारांचे आरोग्य, फिटनेस आणि भविष्यातील शारीरिक सुदृढता यावर अधिक भर देण्यात आला आहे. सर्व पत्रकार बांधव एकत्र येऊन खेळाच्या माध्यमातून आपला मानसिक ताण हलका करत असल्याचे चित्र मैदानावर दिसत आहे.

नामवंत मंत्र्यांची उपस्थिती आणि नाणेफेक

या स्पर्धेतील पाचोरा विरुद्ध जळगाव प्रिंट मीडिया यांच्यातील रंगतदार सामन्याची नाणेफेक (टॉस) जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी दोन्ही मंत्र्यांनी पत्रकार बांधवांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि खेळाडूंना शुभेच्छा दिल्या असून जळगाव जिल्ह्यातील विविध भागांतील २७ पत्रकारांच्या टीम या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. हे सामने सलग तीन दिवस ‘डे-नाईट’ (दिवस-रात्र) खेळवले जात असून, अतिशय खेळीमेळीच्या आणि उत्साही वातावरणात हा सोहळा पार पडत आहे. पाचोरा येथील पत्रकार संघाच्या सहभागामुळे तालुक्याच्या क्रीडाप्रेमींमध्येही आनंदाचे वातावरण आहे. या स्पर्धेमुळे जिल्हयातील पत्रकारांमध्ये एकोपा वाढण्यास मदत होत असून, मैदानावर बॅट आणि बॉलच्या सहाय्याने पत्रकार बांधव खेळाच्या मैदानात रंगताना दिसून आले.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button