नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारणराज्य

ग्रामसभेत गोंधळ,धक्काबुक्की बाळद बुद्रुक येथील घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल


Advertisements
Ad 4

पाचोरा:तालुक्यातील बाळद बुद्रुक येथे गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक संजय आनंदा पाटील ग्रामपंचायत येथे ग्रामसभेसाठी आले होते. राष्ट्रीय पेयजल योजनेतील प्रोसिडिंग बुक जबरदस्तीने मागण्याच्या कारणावरून संशयित आरोपी शेखर पाटील यांनी ग्रामसेवकांशी हुज्जत घालून शासकीय दस्तऐवज फाडले आणि कामात अडथळा आणला तसेच या झटापटीत ग्रामसेवक खाली पडले, तर मध्यस्थी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांची सुटका झाली. शासकीय कामात अडथळा आणून धमकी दिल्याप्रकरणी ग्रामसेवकांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी शेखर पाटील याच्याविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे करत आहेत.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button