नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराजकारणराष्ट्रीयशैक्षणिक

पाचोऱ्यात १ नोव्हेंबरला ‘गुर्जर समाज गौरव समारंभ व सन्मान सोहळा – २०२६’ संपन्न होणार; केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील राहणार उपस्थित


Advertisements
Ad 4

पाचोरा:भारताचे लोहपुरुष आणि एकात्म भारताचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पाचोरा शहरात रविवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता स्वामी लॉन्स, पाचोरा–भडगाव बायपास महामार्ग, गजानन पेट्रोल पंपाजवळ, पाचोरा येथे ‘गुर्जर समाज गौरव समारंभ व सन्मान सोहळा – २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. समाजातील गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, तसेच शैक्षणिक व कृषी क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करून त्यांच्या कार्याचा सन्मान करणे हा या सोहळ्याचा प्रमुख उद्देश आहे.

दिग्गज मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

या दिमाखदार कार्यक्रमाला केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई निखिल खडसे, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, विधान परिषद सदस्य नंदकिशोर भागवत महाजन, आणि पाचोरा–भडगावचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यांसोबतच अखिल भारतीय गुर्जर परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. शांताराम महाजन, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील, मंत्रालयातील राजशिष्टाचार विभागाच्या उपसचिव क्रांती भीमराव पाटील, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, चोपडा नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा नम्रता सचिन पाटील, ओंकारेश्वर संस्थानचे उपाध्यक्ष अशोक महाजन, जळगाव महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील आणि भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे.

तसेच निर्मल सीड्सचे संचालक डॉ. सुरेश पाटील (चहार्डी), पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ, निर्मल सीड्सच्या संचालिका तथा निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या चेअरमन वैशालीताई सूर्यवंशी, गटविकास अधिकारी खुशालचंद अंजने, भाजपचे पाचोरा–भडगाव विधानसभा क्षेत्रप्रमुख अमोलभाऊ शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश भीमराव पाटील, माजी कुलसचिव डॉ. शांताराम बडगुजर, नरेंद्र बडगुजर (लोहारी), समाज प्रतिनिधी प्रल्हाद गुजर (पुनगाव), सूर्यवंशी गुर्जर समाजाचे प्रतिनिधी किरण गुजर (शेंदुर्णी) आणि काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अविनाश भालेराव आदी मान्यवरांचा सहभाग राहणार आहे.

समारंभाचे उद्दिष्ट आणि सामाजिक संदेश

या गौरव सोहळ्यात गुणवंत विद्यार्थी, कृषी क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्ती तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित केले जाणार आहे. समाजातील प्रतिभा, कर्तृत्व आणि सेवाभाव यांना प्रोत्साहन देतानाच विविध क्षेत्रांतील व्यक्तींना एकत्र आणून सामाजिक सलोखा, एकोपा आणि सहकार्याची भावना दृढ करण्याचा प्रयत्न याद्वारे केला जाणार आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकात्मतेसाठी दिलेले योगदान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश लक्षात घेऊन आयोजित करण्यात येणारा हा सोहळा समाजातील गुणवंतांचा गौरव करण्याबरोबरच नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी पाचोरा शहर व परिसरातील समस्त समाजबांधव, नागरिक, गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘गुर्जर समाज गौरव समारंभ आयोजन समिती, पाचोरा व परिसर’ यांच्या वतीने करण्यात आले आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button