नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्या

पाचोऱ्यातील डॉ. कादंबरी संदीप महाजन यांचा अभिमानास्पद प्रवास! सर्वत्र अभिनंदन व कौतुक


Advertisements
Ad 4

मधुर खान्देश वृत्तसेवा: नवी मुंबई – नुसतं डॉक्टर होण्याचा प्रवास म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर त्या ज्ञानाला अनुभव, मूल्यं, कलेची जाण, नेतृत्वगुण आणि मनुष्यत्वाची किनार लाभलेली असते. अशा सशक्त प्रवासाची जिवंत, प्रेरणादायी आणि भावनिक कहाणी लिहिली आहे पाचोऱ्यातील डॉ. कादंबरी यांनी लिहिली आहे. MGM Medical College and Hospital, Kamothe, Navi Mumbai या वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत,आपल्या Bachelor of Physiotherapy (BPT) पदवीच्या अंतिम वर्षातही अत्युत्कृष्ट A+ ग्रेड मिळवून आपल्या शैक्षणिक यशाचा शिखर गाठला आहे. तिच्या या यशाने केवळ तिचे आई-वडील नव्हे, तर संपूर्ण कुटुंब, शिक्षकवर्ग, आणि जिल्हाभरात त्यांचे कौतुक होत आहे.

दि. ७ मे २०२५ रोजी BPT च्या अंतिम वर्षाचा निकाल घोषित झाला आणि त्यामध्ये डॉ. कादंबरीने सलग चार वर्षांत प्रत्येक विषयात A+ ग्रेड मिळविला आहे. अभ्यास, क्रीडा, सांस्कृतिक सहभाग, नेतृत्व, सामाजिक जाणीव आणि संवेदनशीलतेच्या प्रवासात कादंबरीने प्रत्येक भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे. पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत असतांना तिने राष्ट्रीय स्तरावरील खो-खो संघाचे कर्णधार पद भूषवले होते. ही बाब तिच्या नेतृत्वगुणांची, शारीरिक क्षमतेची आणि संघभावनेच्या जाणिवेची ठोस साक्ष देणारी आहे. शालेय वयातच संघ बांधणी, संयमित आक्रमकता आणि जबाबदारीने संघाचे नेतृत्व करण्याची गुणवत्ता तिने दाखवून दिली होती. ही क्रीडा पार्श्वभूमी तिच्या वैद्यकीय शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर उपयोगी ठरली. तिच्या शालेय आयुष्याची ही भक्कम पायरी पायवाट होऊन तिला MGM Medical College and Hospital, Kamothe या देशातील नामवंत संस्थेत वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी मिळाली होती.
महाविद्यालयीन शिक्षणाच्या दरम्यान कादंबरीने केवळ वैद्यकीय ज्ञानातच प्राविण्य मिळवले नाही, तर सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातही तिच्या प्रतिभेचा स्फोट घडवून आणला. नृत्य, नाटक, समूहगीत, स्टेज अँकरिंग, स्पर्धा यामध्ये तिचा सहभाग नेहमीच उठून दिसणारा राहिला. महाविद्यालयात आयोजित विविध स्पर्धा, वार्षिक सांस्कृतिक महोत्सव, क्रीडा स्पर्धा यामध्ये ती एक स्पर्धक म्हणून नव्हे, तर एक संयोजक, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी नेता म्हणून कार्यरत राहिली. याच सहभागातून तिला महाविद्यालयाच्या Cultural Head या पदासाठी निवडणुकीसाठी उभं राहण्याची संधी मिळाली आणि तिने निर्विवाद विजय मिळवून त्या पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. हा विजय केवळ एका पदाचा नव्हता, तर विद्यार्थ्यांच्या मनातील तिच्या नेतृत्वगुणांची आणि विश्वासाची साक्ष होती. या पदावर असताना तिने अनेक नवे उपक्रम राबवले, अनेकांना संधी दिली, विविध महाविद्यालयांमध्ये संस्थेच्या विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करत संस्था आणि विद्यार्थी यांच्यातील नातं बळकट केलं.
या संपूर्ण प्रवासात एक गोष्ट सतत प्रकर्षाने जाणवत राहिली – ती म्हणजे तिच्या स्वभावातील सातत्य, सकारात्मकता, आणि समर्पणाची भावना. ती नेहमी म्हणते की, “यश ही गाठलेली उंची नसते, तर जेव्हा तुम्ही कोणाला तरी उंची गाठायला मदत करता, तेव्हाच तुमचं यश सिद्ध होतं.” त्यामुळेच कदंबरीचं यश केवळ तिच्या गुणपत्रिकेपुरतं मर्यादित न राहता तिच्या आजूबाजूच्या अनेक विद्यार्थ्यांना, मैत्रिणींना आणि नवीन पिढीला एक प्रेरणास्रोत ठरत आहे.
अभ्यासाच्या बाबतीत कधीच शॉर्टकट न निवडता वेळेच्या नियोजनावर भर देऊन प्रत्येक विषयाची खोलवर अभ्यासपूर्वक तयारी केली आणि रुग्णसेवा हा फिजिओथेरपीच्या अभ्यासाचा आत्मा आहे हे लक्षात घेऊन, केवळ गुणांवर नव्हे तर ज्ञानाच्या प्रत्यक्ष उपयोगावर भर देत
आज BPT पूर्ण करून “डॉक्टर” या उपाधीला अधिकृतपणे सामोरी जाते आहे. डोळ्यांत केवळ आत्मविश्वास नव्हे तर नम्रतेचं तेज असून पुढची वाट अजून मोठी आहे – पुढे मास्टर्स, स्पेशलायझेशन, संशोधन, प्रत्यक्ष रुग्णसेवा आणि त्याचसोबत समाजोपयोगी उपक्रम या सगळ्या दिशांना आता ती सज्ज आहे.
डॉ. कादंबरीच्या या यशामागे तिच्या आई-वडिलांचे योगदान अविस्मरणीय आहे. त्यांनी दिलेलं मानसिक, आर्थिक, भावनिक बळ तिच्या प्रत्येक यशात उमटलेलं आहे. तिच्या यशात तिच्या गुरूजनांचे मार्गदर्शन, मित्रमैत्रिणींचे पाठबळ आणि तिच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा आशीर्वाद आहे. या यशाच्या क्षणी संपूर्ण कुटुंब, शिक्षकवर्ग, आणि तिचा गाव पाचोरा अभिमानाने तिचं नाव उच्चारत आहे. डॉक्टर कादंबरी यांना भविष्यात समाजसेवेचा वसाहती घेऊन आपले कार्य दूर ठेवतील असा विश्वास यांचे वडील जेष्ठ पत्रकार संपादक संदीप महाजन यांनी व्यक्त केले आहे.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button