मृत पतीच्या जागेवर सदर विधवा पत्नीची सफाई कामगार म्हणून नियुक्ती करावी!पिंपळगाव हरेश्र्वर येथील ग्रामपंचायत कार्यालयास एकता सफाई कामगार संघटनेची मागणी.

मधुर खान्देश वृत्तसेवा: पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच महाराष्ट्र राज्य एकता सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष अतिश शांतीलाल चांगरे यांच्या माध्यमातून मौजे पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा येथील ग्रामपंचायत मधील कै. बलराज बाबूलाल चनाल हे सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. त्यांचे दिड वर्षापूर्वी निधन झाले असून त्यांची पत्नी सुनिता बलराज चनाल या ग्रामपंचायत कार्यालयात सफाई कामगार म्हणून काम करीत आहे. तसेच मयत कै. बलराज बाबूलाल चनाल यांच्या निधनानंतर मिळणारी वारस हक्क रकम अजून सुद्धा मिळालेली नसून पतीच्या निधनानंतर मिळणारी वारस हक्क नोकरी मयताच्या पत्नीस लेखी नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करावी तसेच सुनिता बलराज चनाल या मयताच्या पत्नीस यांना कायमस्वरूपी नोकरी व आकृती बंधनात समविष्ट करण्यात यावे अशा विनंतीचे पत्रक सागर पारोचे शाखा पाचोरा अध्यक्ष तसेच संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने देण्यात आले आहे.