नियमितपणे बातम्यांसाठी जॉईन करा
जळगाव जिल्हाताज्या बातम्याराज्य

पाचोऱ्याजवळ भीषण अपघात: दोन तरुणांचा जागीच मृत्यू, ५ जण जखमी… ॲम्ब्युलन्स चालकांनी दरवाजा तोडून मृतदेह काढले बाहेर! वेळेवर पाणी टाकले म्हणून लागली नाही आग….


Advertisements
Ad 4
सविस्तर बातमी खाली वाचा

पाचोरा (राहुल महाजन,संपादक): पाचोरा-जळगाव रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कारचालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील काही तरुण इनोव्हा कारने पाचोरा तालुक्यातील एका गावात कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून जळगावकडे परतत असताना, मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास पाचोरा-जळगाव रस्त्यावरील एका हॉटेलजवळ हा भीषण अपघात घडला आहे. वेगात असलेल्या कारवरील चालकाचा ताबा सुटला आणि वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन जोरदार धडकले. ही धडक इतकी भीषण होती की कार दोन ते तीन वेळा पलटी झाली. या अपघातात महावितरणचा विजेचा तारा देखील तुटल्या असून कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.  या दुर्दैवी घटनेत खालील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून श्रीरंग सुरेश पाटील,प्रसन्न रवींद्र निमजे यांचा इनोव्हा गाडीचा दरवाजा तोडून मृतदेह रुग्णवाहिका चालकांनी या ठिकाणी काढला आहे. तसेच गाडीचे रेडिएटर खूप गरम झाल्याने या ठिकाणी गाडीला आग लागण्याची परिस्थिती लक्षात येता रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांनी तात्काळ या गाडीवर पाणी टाकून गाडीला आग लागण्यापासून वाचवले आहे. अपघातातील इतर जखमींना पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले असता या ठिकाणी डॉक्टर सागर गरुड यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ योग्य उपचार देत त्यांचे जीव या ठिकाणी वाचवले आहे.तर गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी तातडीने जळगाव येथे हलवण्यात आले असल्याची देखील माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती  मिळताच रुग्णवाहिका चालक बबलू मराठे,भागवत पाटील, गोलू पाटील तसेच किशोर लोहार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना कळविले होते. घटनेचे गांभीर लक्षात घेता पाचोरा पोलिस कर्मचारी गजानन जोशी,दिलीप पाटील,दिलीप वाघमोडे,अशोक पाटील,वाशिम शेख,गजानन देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार करत आहेत.


संपादक : राहुल महाजन

सतत १५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले राहुल महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एक अभ्यासू पत्रकार म्हणून परिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाचोरा येथील एम.एम.महाविद्यालयात बी.कॉम मध्ये पदवी प्रदान केली असून त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आय.एम.आर जळगाव येथे मास्टर ऑफ बिजनेस मॅनेजमेंट (कॉम्पुटर मॅनेजमेंट) पदवीत्तर शिक्षण घेतले आहे. मीडियामध्ये काम करत असतांना मास कम्युनिकेशन मध्ये डिप्लोमा देखील त्यांनी केला आहे. या आता सध्या मधुर खान्देश या शासन मान्यता प्राप्त वृत्त पत्राचे ते मालक तसेच मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. (पाचोरा न्यायक्षेत्र अंतर्गत)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button