जळगाव जिल्हाताज्या बातम्याराज्य
कृष्णापुरी येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांचे वडील हिरामण पाटील यांचे दुःखद निधन; आज संध्याकाळी निघणार अंत्ययात्रा

पाचोरा (कृष्णापुरी): येथील कृष्णापुरी भागातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते विनोद हिरामण पाटील यांचे वडील हिरामण संपत पाटील यांचे आज दुपारी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पाटील परिवारावर शोककळा पसरली असून, कृष्णापुरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्व. हिरामण पाटील यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन सुना आणि नातवंडे असा मोठा आणि सुविद्य परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी ठीक ६:०० वाजता त्यांच्या राहत्या घरापासून (कृष्णापुरी) अंत्यसंस्कारासाठी अंत्ययात्रा निघणार आहे, अशी माहिती त्यांच्या कौटुंबिक सूत्रांनी दिली आहे.




